Powered By Blogger

Thursday, 19 April 2012

तुझी आठवण


मी एकटी असताना तुझी खुप आठवण येते,
अन तुझी आठवण आल्यावर मी एकटी पडते.

रात्रीच्या अंधारात तुला शोधात असते,
तुला शोधता शोधता स्वतःलाच मग हरवून बसते.

मी एकटी असताना तुझे शब्द आठवतात,
अन तुझ्या शब्दातली ती मी आठवते.

माझ्याबद्दल बोलता बोलता तू चक्क कवी व्हायचास,
अन तुझ्या तोडक्या मोडक्या कवितेन माझं  मन जिंकायचास.

मी एकटी असताना तुझ हसणं ऐकू येतं,
अन ते ऐकताना माझ्या गालावर हसू येतं.

अजूनही आठवतं ते तूझं माझ्यावर जिवापाड प्रेम करणं,
अन प्रेम करता करता भांडायला लागणं.

मी एकटी असताना तुझ रागावणं आठवतं,
अन त्या रागावण्यातली ती माझ्याबद्दलची काळजी आठवते.

त्याची एव्हडी आठवण काढूनही
त्याला मात्र खंत एकाच गोष्टीची वाटते...
ती म्हणजे, मला त्याची आठवण
 मी एकटी पडल्यावरच का येते?

No comments:

Post a Comment