Powered By Blogger

Friday, 20 April 2012

ती..

   आज अशीच खिड़की बाहेर बघत बसले, खूप गर्दी दिसते लोकांची. असा वाटत खूप मुंग्या एकत्र जात आहेस, पण कोणाला कशाचीच चिंताच नही. सगळे आपल्या धुंदीत. संज्याची वेळ होती ती, कही तरी वेगल दिसल. एक उदास चेहरा, काही तरी विचार करणारा.. कुठेतरी हरवलेला, कहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत असतात तिचे डोळे. हाताने कही तरी स्पर्ष करायचा प्रयत्न करत असते ती, शांता निरागस पण त्रसलेली. मनात एक काटा टोचत असेल. खुप कही बोलायला असत सांगायला असत.. पण कधी कधी कुठून सुरवात करायची समजतच नहीं, अणि त्याचा शेवट काय होइल याचा भीतीने चुप रहाणे हा एव्हडाच एक रास्ता डोळ्यापुढे उभा राहतो. छोट्याश्या जीवनाला का बारे एवढे प्रश्न पडतात कोणास ठहुक? 
     खूप वेळा वाटल जाउन बोलूया का? पण नको ती अशीच ठीक आहे, जे ती शोधण्याचा प्रयत्न करत आहे ते तिलाच सापडले तर जास्त चांगला नही का.. म्हणतात की हे जीवन खुप छोटे आहे, तर कधी त्रासामधे खूप मोठे ही वाटू लागते.. या आयुष्यात आपण एकटेच येतो अणि एकटेच जातो. पण मग तिचा जीव का बारे कोणाला शोधतो, खुप गर्दित वाट चुकल्यावर पाय कसे पटापट चालू लागतात तशी कही तरी मनस्थिति वाटते. 
      ती आयुष्याकड़े खूप वेगळ्या नज़रेने बघत असावी, मग का बारे असे दुक्खी रहायचे? आमची आई म्हणतेना जीवन हा एक संघर्ष आहे, मग जिंकून दाखू की आपण. वाटेवर खूप काटे येतात पायाला टोचतात पण म्हणून कई आपण वाट नहीं बदलत, पायाला टोचलेले काटे काढून पुढे जात राहतो तसेच जाउया.
       आज देखिल नवा संघर्ष करुया, नव्या दुक्खाला परत एकदा समोर जाउया ...

No comments:

Post a Comment